Nilesh Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर जत्रेत पैलवानाचा हल्ला, धाराशिव जिल्ह्यात प्रकार

Nilesh Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर जत्रेत पैलवानाचा हल्ला, धाराशिव जिल्ह्यात प्रकार

nilesh ghaywal

विशेष प्रतिनिधी

Pune News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील एका गावच्या जत्रेत हल्ला झाला. एका पैलवानाने त्याच्यावर हल्ला केला. घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत होते. हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात निलेश घायवळ हा जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातून मल्ल उपस्थितीत होते. या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पैलवानांना भेटण्यासाठी गेला असता, अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. निलेश घायवळ याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर भूममध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, भूम तालुक्यातील आंदरूड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या हल्लेखोरांचा वाशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आंदरुड येथे यात्रेदरम्यान प्रसिध्द कुस्ती पटू थापाच्या कुस्तीवेळी हा घडला प्रकार घडला.यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन कुख्यात गुंड निलेश घायवळ याने केले होते,असे सांगण्यात येत आहे. आयोजक घायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत असताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे.

निलेश घायवळ याच्यावर हल्ला करताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली.मात्र यादरम्यान हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Notorious gangster Nilesh Ghaywal attacked by wrestler at fair, incident in Dharashiv district

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023