विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले आहे. जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना म्हणत त्यांनी थेट पक्षाला इशारा दिला आहे. मात्र यावर हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. तो पक्षांतर्गतच सोडवू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दिली आहे.
अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्यातील सारथीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सारथी कार्यालयाला भेट दिली. नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू, अशी प्रतिक्रिया दिली.
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. यावर भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही. याची काळजी मलाही खूप आहे. Ajit Pawar
एका बाजूला भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता अजित पवार यांनी मात्र हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे असे सांगून त्यांच्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
On Chhagan Bhujbal Jahan nahi chaina waha nahi rahna, Ajit Pawar said
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
- Parliament : संसदेतील गोंधळाच्या तपासासाठी सात सदस्यीय एसआयटीची स्थापना
- मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक
- Devendra fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस