विशेष प्रतिनिधी
पुणे / कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून तसेच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्याप्रकरणी फरार असलेला प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. कोरटकरला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली असून, कोल्हापूर पोलिस लवकरच त्याला ताब्यात घेणार आहेत.
कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. २५ फेब्रुवारीला त्याने शिवरायांबाबत वादग्रस्त विधाने केली आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्या. त्यानंतर तो नागपूरहून फरार झाला आणि चंद्रपूरमध्ये लपून बसला. कोल्हापूर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथूनही पळून गेला. अखेर महिनाभराच्या शोध मोहिमेनंतर त्याला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली.
कोरटकरने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्याच्या आधारावर शोधमोहीम राबवत त्याला अटक केली.
कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात इंद्रजीत सावंत यांनी कोराटकरविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर त्याला अटक करण्यात यश आले.
गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक केली. 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. त्या दिवसांपासून कोरटकर हा फरार होता. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून त्याने मध्यंतरी अंतरिम जामीन मिळवला होता. 11 मार्च रोजी अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अंतरिम जामीन मुदतवाढ अर्ज फेटाळण्यात आला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा कोरटकर हा फरार झाला होता. अखेर आज सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावर तेलंगणा राज्यात कारवाई करत अटक केली.
Prashant Koratkar, who made objectionable remarks about Chhatrapati Shivaji Maharaj, finally arrested
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप