Prashant Koratkar पिंपरीतील बिल्डरच्या फार्म हाऊसवर सापडली प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस

Prashant Koratkar पिंपरीतील बिल्डरच्या फार्म हाऊसवर सापडली प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस

विशेष प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस कार पिंपरी चिंचवड येथील बिल्डर तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर सापडली आहे. यामुळे कोरटकरची ही आलिशान कार कुठे गेली? ही कार रितसर विकत घेतली असून, त्याचे सर्व दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा कलाटे यांनी केला आहे.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी 24 मार्च रोजी तेलंगणातून अटक केली. सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. कोरटकरचे रोल्स रॉईस या महागड्या कारसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ही कार आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावाने होती. ती कोरटकरकडे कशी आली? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाला होता. सीआयडीलाही ही कार सापडत नव्हती. पण आता WB-02-AB 123 क्रमांकाची ही कार पिंपरी चिंचवड येथील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसवर उभी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मनोहर भोसले या वादग्रस्त मांत्रिकासोबत कोरटकर व तुषार कलाटे यांचे काही एकत्रित व्हिडिओही समोर आले आहेत. मनोहर भोसलेवर यापूर्वी अघोरी विद्येच्या माध्यमातून अनेकांना लुबाडल्याचे व लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. .

महेश मोतेवारवर लक्षावधी गुंतवणूकदारांची 4700 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. मोतेवारच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करणे या प्रकरणात अपेक्षित होते. पण आता लिलावाची जबाबदारी असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीच त्याची मालमत्ता लुबाडल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी त्याची 7-8 कोटींची रोल्स रॉईस कार जप्त केली. पण तिचा लिलाव केला नाही. ही कार विकता येणार नसल्याची नोटीस सीबीआय व सीआयडीने 2015 मध्ये काढली होती.

पण प्रशांत कोरटकरने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या आपल्या संबंधांतून ही नोटीस कथितपणे मागे घ्यायला लावली. गाडीवर कर्ज असल्याचे दाखवत बँकेमार्फत तिचा लिलाव घडवून आणला. त्यानंतर कलाटेंनी ही गाडी 2 कोटींना खरेदी केली. त्यानंतर कोरटकरने ही गाडी पुण्यातील रेंजहिल्स भागात चालवित आपले फोटो काढले व व्हिडिओही शूट केले. कोल्हापूर पोलिस व सीआयडी या कारचा शोध घेत होते. पण ती सापडत नव्हती.

Prashant Koratkar’s Rolls-Royce found at builder’s farmhouse in Pimpri

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023