विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे लागले आहेत. आपले आजोबा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरविणार असे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे देखील बैठकीला होते. त्या बैठकीत आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील, असे निर्देश किंवा तसे एक संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाची कारणे काय? यावर विचारमंथन करण्यात आलं होतं. तसेच आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले होते. दरम्यान, याच बैठकीत पक्षाच्या एका कार्यकर्त्याने शरद पवार यांच्याकडे पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची मागणी केली होती. जिल्हा पातळीपासून ते थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वांचे राजीनामे घ्या आणि पुन्हा निवड करून नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी कार्यकर्त्याने केली होती. त्यानंतर शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा रंगली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षात फेरबदल करण्याची मागणी केली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीची मोठी चर्चा देखील रंगली होती.
“सर्वच पक्षात बदल होत असतात आणि झालेही पाहिजेत. मग जे सत्तेत आहेत त्यांच्या पक्षात बदल करायचा किंवा नाही? तो त्यांचा विषय आहे. मात्र, आमच्या पक्षाबाबत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे देखील बैठकीला होते. त्या बैठकीत आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील, असे निर्देश किंवा तसे एक संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात देखील काय होतंय? ते येत्या काळात पाहावं लागेल. प्रत्येक पक्षात बदल झाले पाहिजेत आणि बदल होत असतात. त्यामुळे आता काय बदल होतात ते पाहावं लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. शरद पवार गटात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला होणारा विरोध हा त्यांचा मराठा द्वेष दाखवतो का? असा सवाल करत आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. जयंत पाटलांवर स्तुतीसुमनं उधळतांना मिटकरींनी त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांचा दाखला दिला होता. प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ झालेत का? असा सवालही त्यांनी केलाय. जयंत पाटलांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे अनेक दुर्योधन शरद पवार गटात असल्याचा टोला त्यांनी लगावला होता
Rohit Pawar wants to be the state president, tussale with Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष