विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. पण, एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसे नाहीत. राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती वेळ आहे, अशा सूचना करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला.
दिल्लीच्या कार्यकारणी बैठकीत शऱद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला. पण एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाहीत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत पहिल्यांदाच पक्षाची दिल्लीत बैठक घेण्यात आली.
राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच विनोदवीर कुणाल कामरांविरोधातील वाद उफाळून आला असताना, देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ असल्याचेही पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनीही राज्यात तसेच, देशात वाढत असलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या घटनांचा मुद्दाही उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
‘औरंगजेबाची कबर ही आमच्या शौर्याचे प्रतीक आहे, पराभवाचे नव्हे. महाराष्ट्राला गुजरात आणि मध्य प्रदेशप्रमाणे धर्माच्या राजकारणाची प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मा-धर्मामध्ये तेढ, द्वेष निर्माण करणाऱ्या विचारसरणीला तीव्र विरोध केला पाहिजे, या विचारसरणीविरोधात लढले पाहिजे, अशी भूमिका बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले. Sharad Pawar
Sharad Pawar message to fight with renewed hope
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची