विशेष प्रतिनिधी
पुणे : Psychiatric hospital पुण्याच्या येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांच्या अंतर्वस्त्रापासून अंघोळीच्या पाण्यापर्यंत झालेला भ्रष्टाचार चौकशीत उघड झाला आहे. या प्रकरणी मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांपासून चौघाजणांवर सोमवारी कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयातील विविध खरेदीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे.Psychiatric hospital
येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर सव्वा कोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. रुग्णालयाची देयके फुगविण्यासह सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अधीक्षकांसह तत्कालीन सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी शिफारसही समितीने केली असून याबाबतचा अहवाल आरोग्य आयुक्तांच्या माध्यमातून आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडे अंतिम कारवाईसाठी गेला आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने येत्या एक दोन दिवसात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश जारी केले जातील.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात घोटाळ्यांची जंत्री सादर करण्यात आली असून मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ‘डॉ. पाटील यांनी २०१७ पासून रुग्णालयात सव्वा कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून, त्यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक व लिपिक यांच्याकडून हे पैसे वसूल करावेत,’ असे समितीने म्हटले आहे. डॉ पवार यांनी हा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर आता कारवाईसाठी सचिव निपुण विनायक यांच्याकडे अहवाल प्रलंबित आहे.
Shocking…Corruption in the regional psychiatric hospital, from the underwear of psychiatric patients to the bath water
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!