विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: Sanjay Shirsat मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट दिल्यानंतर तेथील अवस्था पाहूनसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. 28 तारीखला पुण्यात समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. वसतीगृहांची अवस्था अशी का? या सगळ्याची उत्तरे आयुक्तांकडून घेणार आहे असे शिरसाठ यांनी सांगितले.
शिरसाठ म्हणाले, छत्रपती संभाजी नगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट दिली. पाच लोकांचा स्टाफ आहे. त्यातील तीन लोकं गैरहजर आहेत. अशा पद्धतीने जर वसतीगृहाचा कारभार चालत असेल तर महाराष्ट्रात सगळीकडे अशीच अवस्था असेल. मी परवा समाजकल्याण आयुक्तांना भेटणार आहे. त्यांना सांगणार की तु्म्ही सर्व जाऊन पहा.
मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
शिरसाठ म्हणाले, यांना जो भरघोस निधी दिला जातो तो जातो कुठे? या मुलांची अवस्था अशी का? या सगळ्याची उत्तरे आयुक्तांकडून घेणार आहे 28 तारीखला पुण्याला समाजकल्याण विभागातील जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक घेणार आहे. विद्यार्थी वसतीगृहात आले काय, राहिले काय यांना काही फरक पडत नाही. विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या मिळत आहेत. विद्यार्थी घडवायला आलेत की बिघडवायला ? याची चौकशी होऊन कारवाई करणार आहे. वसतीगृहाच्या खोल्या पाहिल्या तर जनावर पण एकदिवस राहणार नाही
Social Justice Minister Sanjay Shirsat is angry after seeing the condition of the hostels for backward class students.
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा