धर्मादाय रुग्णालयांची झाडाझडती, विशेष तपास पथक करणार पाहणी

धर्मादाय रुग्णालयांची झाडाझडती, विशेष तपास पथक करणार पाहणी

charitable hospitals

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. धर्मादाय रुग्णालयांची आता झाडाझडती घेतली जाणार असून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश दिले आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले की, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात 10 टक्के खाटा निर्धन घटक, तर 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये.

धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण तसेच समन्वयासाठी प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाइन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रूग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Special investigation team to conduct raids on charitable hospitals

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023