विशेष प्रतिनिधी
Pune News: भोरमधील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) भर उन्हात धरणे आंदोलन करत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन सुरु आहे. बुधवारी सकाळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण आंदोलनला सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे भर उन्हात आंदोलन सुरु आहे. कडक उन्हात त्यांनी डोक्यावर पदर घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे.
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, मात्र रस्त्याचे काम होत नाही. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण झाले पाहिजे. रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे, असे खासदार सुळे म्हणाल्या. प्रशासनाच्या अनास्थेमुळे सुप्रिया सुळे यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
याआधीही प्रशासनाच्या अनास्थेला कंटाळून 4 मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र त्यापूर्वी 3 मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल, असा शब्द दिला होता. त्यामुळे काही कालावधीसाठी मी हे उपोषण स्थगित केल होतं. पण महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Supriya Sule’s protest in the scorching sun for the road
महत्वाच्या बातम्या