Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची पलटी, ईव्हीएम आरोपावरून काँग्रेसलाच सुनावले

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची पलटी, ईव्हीएम आरोपावरून काँग्रेसलाच सुनावले

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणूक दारुण पराभव झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्याचा आरोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ही त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र आता त्यांनी पलटी मारली असून असे आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षांना सुनवले आहे.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “मी ठोस पुराव्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कोणतेही आरोप करू शकत नाही. पण, इतर पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा दावा केल्यामुळे या विषयावर चर्चा आवश्यक आहे. माझ्याकडे ठोस पुरावे असल्याशिवाय आरोप करणे योग्य नाही, असे मला वाटते. मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमद्वारे जिंकल्या आहेत.

लोकसभा आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्या आणि यातूनच एकतर्फी निकाल लागला असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा जास्त ताणून धरला असून ‘इंडी’ आघाडीमधील काही घटक पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होत नसल्याचे उघडपणे सांगून यातून काढता पाय घेतला आहे.

अशातच आता काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधाच्या मुद्द्यावरून ‘इंडी’ आघाडीत ताळमेळ नसल्याचे बोलले जात आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही यापूर्वी ईव्हीएम संबंधीच्या काँग्रेसच्या आरोपांवरून काँग्रेसची कानउघडणी केली होती. ईव्हीएमबाबत काँग्रेसकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना ओमर यांनी हास्यास्पद ठरविले होते. ते म्हणाले होते की, जेव्हा तुम्हाला याच ईव्हीएमवर लोकसभेत शंभर जागा मिळतात, तेव्हा तुम्ही पक्षाचा कसा विजय झाला याचे गुणगान गाता.

पण काही महिन्यांनी जेव्हा निकाल बदलतात तेव्हा निकाल काही आपल्या बाजूने लागले नाहीत असे म्हणत त्याच ईव्हीएमला विरोध करता. तुमचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही तर तुम्ही निवडणुका का लढता?

Supriya Sule says allegations against EVMs are unfair unless there is evidence

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023