विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुपारी देण्याची गोष्ट करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचा विसर पडला की सुपारी देण्याची प्रथा तुम्ही पाडली आहे. आम्ही त्याचे कधी भागीदार नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मातोश्रीवरच भुंकणे ही सुपारी राणेंना कोणी दिली?’ असा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका कवितेने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला कोणी सुपारी दिली असा सवाल विधानसभेत केला. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मातोश्रीवर भुंकण्याची सुपारी राणेंना कोणी दिली’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
चला भक्तांनो,
कामराचा स्टुडिओ फोडला..!
आता आपटे, सोलापूरकर , कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची..? @kunalkamra88 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #चलागाण्याचाट्रेंडकरूया pic.twitter.com/vTv6ctNsyd— SushmaTai Andhare (@andharesushama) March 24, 2025
सुषमा अंधारे म्हणाल्या की, संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकाट अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कुणाल कामरा हे याच देशाचे नागरिक आहेत. त्यांना हे स्वातंत्र्य असायला हरकत नाही, कुणाल कामराच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही आशलाघ्य भाषा नाही. कुठलाही कलाकार त्याचं म्हणणं उपहासात्मक पद्धतीनं मांडू शकतो. लोकांनी सोलापूरकरांचा स्टुडिओ फोडला नाही,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत कुणाल कामराच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘सुपारी घेऊन राज्याच्या उच्च पदस्थ नेत्यांबद्दल काहीही बोलणाऱ्यांना सोडणार नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी लेफ्ट लिबरल, अर्बन नक्षल यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा याने सादर केलेल्या कवितेचा व्हिडिओ देखील आज सोशल मीडियावर पोस्ट केला.
Sushma Andhare questions the Chief Minister fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप