विशेष प्रतिनिधी
पुणे : धुळवडीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी बुरा ना मानो होली है म्हणत सुषमा अंधारे यांनी साधला महायुतीच्या नेत्यांवर कवितेतून निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंपासून सुरेश धस, किरीट सोमय्या, आणि चित्रा वाघ, तसेच नितेश राणे यांच्यावर कवितेच्यामाध्यमातून जोरदार टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी होळीच्या निमित्ताने ‘शोपीसांच्या बाहुल्या नाही, पेटत्या मशाली रे, बुरा ना मानो होली रे.. ‘ असे म्हणत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
महायुतीची दुसरी टर्म सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे गेले. तेव्हापासून फडणवीसांना देवाभाऊ नावाने संबोधले जाऊ लागले. याच नावाने सुषमा अंधारेंनी कवितेची सुरुवात करत एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
शोपीसच्या बाहुल्या नाही
पेटत्या मशाली रे
बुरा ना मानो होली रे….@ANI @PTI_News pic.twitter.com/A8ACnNtNXL— SushmaTai Andhare (@andharesushama) March 13, 2025
सुषमा अंधारे यांची कविता :
देवाभाऊ तारी त्याला कोणी मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी
सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दाढी
फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका
अन् बावनकुळेंच्या गौप्यस्फोटाने जमीनीवर आले सुरेश आका
दरवेळी नवा गडी, नवा राज्य, नवा पक्ष, नवी चूल
तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल
एका खासदारकीची तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल
याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाल्या बेड्या
स्वकियांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सीड्या
चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट
ईडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट
लाचखाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे
चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्रा आहे
सदा-गुणा-राणा-रुपा यांची महायुतीने भरवला बाजार आहे
जिहाद-हलाल-झटका-मटका हा टिल्ल्यांचा मानसिक आजार आहे
बुरा ना मानो होली है