विशेष प्रतिनीधी
पिंपरी : ‘पक्षात गट-तट चालणार नाहीत. कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, रस्त्यावर उतरून संघर्ष करा, असा सल्ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आलेल्या सपकाळ यांनी शनिवारी काँग्रेस भवनात संवाद साधला. ते म्हणाले, ‘गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. संघटनात्मक ताकद वाढवावी. पक्षाचे संघटन बळकट करून बूथ कमिट्या सक्षम कराव्यात. सदस्यनोंदणी करावी. यापूर्वी प्रदेश नेत्यांचे शहराकडे दुर्लक्ष झाले असेल; परंतु यापुढे होणार नाही. मी स्वतः शहराकडे लक्ष देणार आहे.महापालिका निवडणूक कधी होईल हे माहीत नाही.
मात्र, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. स्वबळावर की महाविकास आघाडीसोबत लढायचे, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावे. महापालिकेत काँग्रेसचा प्रतिनिधी असलाच पाहिजे. काही दिवसांत शहरात निरीक्षक पाठवले जातील. ते सर्वांच्या समस्या जाणून घेतील.’
पिंपरी- चिंचवड ही उद्योगनगरी आहे. उद्योजकांच्या समस्या, वाढती महागाई, महापालिकेतील भ्रष्टाचार, सहा वर्षांपासून सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा, शहरात होणारी वाहतूककोंडी या विविध प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, अशी सूचना सपकाळ यांनी केली.
take to the streets and fight, advises Congress State President Harsh Vardhan Sapkal
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार