विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाना सावरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस याना छळत आहेत का? असा प्रश्न पडल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्याच्या काळ संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, या अधिवेशनाकडे आपणं पाहिलं, तर पाशवी बहुमत मिळवल्यानंतर काही मिळणार नाही, असं हे अधिवेशन होतं. अपयश आणि अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात आम्ही काय करणार आहोतं, सांगितलं गेलं होतं. पण त्याचं काय झालं?
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांना हमीभाव मिळत नाही. वनविभागाला न्याय मिळत नाही. या 100 दिवसाच्या आराखड्यातील एकही गोष्ट या सरकारने पूर्ण केलेली नाही किंवा त्याबाबत निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले नाही. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक हत्या घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. शांत असलेल्या नागपूरमध्ये दंगल झाली. माझा तर संशय आहे की, ज्या लोकांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे, त्यांनी अशा घटना घडवल्या आहेत का? असा संशय ठाकरेंनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कबरीपासून कामरापर्यंत असे हे अधिवेशन झालं. हे जयंत पाटील म्हणाले, ते बरोबर आहे. कारण या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. त्यामुळे विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात हे सांगितलं. असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला, असंही कधीच झालं नव्हतं.
अधिवेशन काळात आम्हाला बोलू दिलं असतं आणि उत्तरं दिली असती तर मला जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा वारेमाप घोषणा सरकार करत आहे. जनता भोळीभाबडी आहे, त्यामुळे जनतेला फसवा आणि सत्तेत या. त्यानंतर जनतेला चिरडून टाकलं गेलं. परंतु ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही, ती यांना काय जमणार?
The Chief Minister is saving everyone but Shinde is torturing him, Uddhav Thackeray criticizes
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची