विशेष प्रतिनिधी
पुणे : Chief Minister मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ४ आणि ५ एप्रिलला पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, तसेच महत्त्वाचे महसूल अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.Chief Minister
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा सर्व विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोककेंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, अशी मुख्यमंत्र्यांची कल्पना आहे.
बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेल येथे ४ आणि ५ एप्रिल रोजी ही कार्यशाळा होणार आहे. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक संचालक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, महसूल विभागाचे सर्व अपर आयुक्त, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे सर्व सहसचिव, उचसचिव, सर्व अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत राजस्तरीय धोरण आणि त्यांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी यांच्यात समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महसूल अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात राबविलेल्या योजनांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच नवीन संकल्पना मांडून त्यावर चर्चा होईल. या योजनांचा अवलंब करून जिल्हा आणि विभागीय पातळीवर प्रशासन अधिक प्रभावी कसे करता येईल, यावर विचारमंथन होईल.
The Chief Minister will review the 100-day action plan from District Collectors across the state.
महत्वाच्या बातम्या
-
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा