विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने वरद तुकाराम कणकी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याचबरोबर सायबर सेलला आणखी एक संशयित पद्माकर आंबोळकर याची ओळख पटली असून, त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित मुंबईतील वरळी भागातील आहेत.
सायबर सेल त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य संशयितांची चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फेरफार केलेला आणि अपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने गेल्या आठवड्या १२ सोशल मीडिया युजर्सविरोधात गुन्हा दाखल केला होता. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिडिओचा कंटेंट सामाजिक अशांतता भडकवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होती. यामुळे विशिष्ट गटांच्या भावना दुखावल्यास महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते.
The person who uploaded offensive video of Chief Minister Devendra Fadnavis on social media is in custody of cyber cell
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : तर मराठे रस्त्यावर उतरणार, मनोज जरांगे यांचा इशारा
- Uddhav Thackeray : चंद्रकांतदादांकडून उध्दव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम, पुण्यातील पाच नगरसेवक करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र
- Ministry of Defence : संरक्षण मंत्रालयाने 2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून केले घोषित
- Suresh Dhas : माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करा, आमदार सुरेश धस यांना बावनकुळेंची तंबी