विशेष प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे. या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आल्या असता अगोदर अनामत रक्कम म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसतील तर ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
डॉ. घैसास यांनीर राजीनामा दिला म्हणजे काय झालं? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का?
“मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिलाय, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्या मुलींवर आयसीयूमध्ये उपचार चालू आहे. त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दु:खातून जात आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवावी. त्या मुलीची जी हत्या झाली, तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजेत. त्या दिशवी नेमकं काय झालं, ते समोर आलं पाहिजे,” अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर, तसेच महिलेच्या हत्येत जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समविष्ट आहेत, त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली.
The woman’s death is murder, file a case against the doctor, demands Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख