Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती

Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती

Devendra Fadanvis

प्रतिनिधी

पुणे : Devendra Fadanvis पुणे शहर परिसरात अशा प्रकारची कोणतीही कोयता गँग अथवा कोयत्याचा वापर करून संघटित गुन्हेगारी करणारी टोळी अस्तित्वात नाही. एरियाचा भाई होण्याच्या आकर्षणापोटी काही अल्पवयीन मुले कोयत्याचा वापर करत दहशत माजवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.Devendra Fadanvis

पुण्यातील धानोरी लोहगाव परिसरात कोयता गँगने दुकाने तसेच रस्त्यावरील वाहनांच्या काचा पडल्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यावर मुख्यमंत्री म्हणाले, संघटित गुन्हेगारी करणारी कोणतीही कोयता गँग नाही. पण गुंडगिरीच्या आकर्षणापोटी काही अल्पवयीन मुले कोयता हाती घेऊन असे गुन्हे करतात. मात्र या मुलांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांनीच प्रत्यक्ष गुन्हा केला आहे असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांचा यात सहभाग आढळल्यास त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल. शहरातील अनेक टपऱ्या किंवा अन्य ठिकाणावरून अशा प्रकारच्या गोष्टींची विक्री होत आहे. त्यासाठी अशा पान टपऱ्या आणि अन्य ठिकाणावर लक्ष ठेवण्यात येत असून यात कोणी सापडल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.

पुणे शहरात कोयता हातात घेऊन कायदा तसेच सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारीच्या 9 घटना घडलेल्या आहेत. यामध्ये 19 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 13 आरोपी विधी संघर्षित बालके आहेत. पुण्यात कुठल्याही प्रकारची कोयता गॅंग अस्तित्वात नसून अशा गुन्ह्यांमध्ये 15-16 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या विधी संघर्षित बालकांसाठी दिशा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसांगितले.

पुण्यातील सीसीटीव्हीचे जाळे आणखी मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवता येईल. वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये किंवा अन्य घटनांमध्ये लहान मुलांचा अन्य लोकांकडून वापर केला जातो. त्यांना अमली पदार्थांचे व्यसन लावून त्यांच्याकडून काही गुन्हे करवून घेतले जातात असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी विदेशी नागरिकांना गुन्ह्याचा निकाल लागे पर्यंत ‘डिपोर्ट’ करता येत नाही. गुन्हे सिद्ध होऊन निकाल लागल्यानंतर त्यांना ‘डीपोर्ट’ करण्यात येईल. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून इलेक्ट्रिक गॅझेटच्या माध्यमातून गुन्हेगारांची ट्रॅकिंग करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून शक्य असल्यास ट्रॅकिंगही करण्यात येईल.

There is no Koyata gang in Pune but there is terror from minors to become Bhai of area, CM informs

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023