विशेष प्रतिनिधी
पुणे : Supriya Sule महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली आहे. आजकाल वर्दीची भीतीच राहिली नाही. अगदी वाल्मिक कराडने देखील व्हिडिओ टाकला आणि मी येतोय असं सांगितले. हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडने केलेला अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.Supriya Sule
सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगार मोकाट आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. पुण्यामधला डेटा सांगतो किती मोठी गुन्हेगारी वाढली आहे. पुण्याचे पालकमंत्री आता बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मागील गुन्ह्यांची एक वर्षाची इन्क्वायरी लावली आहे परंतु आमची मागणी आहे पारदर्शकपणे ही सगळी चौकशी झाली पाहिजे.
बीडमध्ये वाढलेल्या जातीयवादाच्या पार्श्वभूमीवस्तदनाव लावायचे नाही असा निर्णय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, मी बीडच्या पोलीस अधीक्षकांचे पहिल्यांदा आभार मानते. त्यांनी फक्त पहिलं नाव लावायचं अशी मोहिम हाती घेतली. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अनेक गोष्टी बीडमध्ये घडत होत्या. त्या बाहेर येत नव्हत्या. त्यात बाहेर येऊ लागल्या आहेत.मी दोन्ही कुटुंबाच्या संपर्कात आहे . आधीपेक्षा सगळ्या तपासात सुधारणा आहे. पण अजून खूप काही करण्यासारख आहे. सरकारने नैतिकता दाखवली नाही परंतु माध्यमांनी नैतिकता दाखवली
जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून जाण्याच्या चर्चेवर सोळी म्हणाल्या, मी इकडे यायच्या अगोदर जयंत पाटलांना एक तास भेटून आली आहे. राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केलं आहे. इतकी मोठी संघटना इतका मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेहवेसे वाटताहेत. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे.