Narayan Rane हिशोब होणार, नारायण राणे यांच्या अटकेवरून नितेश राणेंचा इशारा

Narayan Rane हिशोब होणार, नारायण राणे यांच्या अटकेवरून नितेश राणेंचा इशारा

Narayan Rane

विशेष प्रतिनिधी

कणकवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्राने पहिला होता. त्याची सल अद्यापही नितेश राणे यांच्या मनात आहे हे दिसून आले आहे. जोपर्यंत या अटकेचा हिशोब होत नाही तोपर्यंत त्या प्रसंगाचा व्हिडिओ डिलिट करणार नाही असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. पण हिशोब म्हणजे काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक होण्याची शक्यताही त्यामुळे वर्तविली जाऊ लागली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात माजी मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. नारायण राणे जेवत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या घटनेचा उल्लेख करत कॅबिनेट नितेश राणे यांनी आता परतफेड करणार असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. २३ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली होती.

नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. महाडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे म्हणाले होते की, ‘स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती’, असे विधान राणेंनी केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.

याचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले, साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतो.

नितेश राणे यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. नारायण राणेंच्या अटकेच्या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचीही त्यावेळी चर्चा झाली होती. एका पत्रकार परिषदेत मोबाईलवरून संवाद करतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे नितेश राणेंनी कुणाला इशारा दिला, याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहे.

There will be a reckoning, Nitesh Rane warns on Narayan Rane’s arrest

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023