महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागलेला असून, एकही नागरिक हरवलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Devendra Fadnavis
पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अर्बन डायलॉग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. “सर्व पाकिस्तानी नागरिक आढळले असून, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ते देशाबाहेर जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जलसाठ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “एप्रिल-मे महिन्यात जलसाठा कमी होणे नवे नाही. मात्र, यंदा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी ३२ टक्के जलसाठा होता, तर यावर्षी तो ३८ टक्के आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, सध्या कमी जलसाठा असलेली ठिकाणे ही मुख्यतः लहान धरणे आणि तलाव आहेत, तर मोठ्या धरणांमध्ये पुरेसा साठा आहे.
पुणे शहराच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “न्यायालयीन प्रकरणांमुळे विकास आराखड्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.” त्यांनी अनधिकृत फ्लेक्सबाजीवरही चिंता व्यक्त करत सांगितले, “स्वतःचे फ्लेक्सदेखील जर अनधिकृत ठिकाणी लावलेले असतील तर ते काढण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या आहेत.”
‘पुणे अर्बन डायलॉग’च्या माध्यमातून शहरी नियोजन, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यावर चर्चा होणार असून, या चर्चेच्या आधारे एक धोरणात्मक रोडमॅप तयार केला जाईल व राज्य सरकार त्यावर निश्चितपणे कार्यवाही करेल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.
There will be no Pakistani citizen in Maharashtra, says Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला