विशेष प्रतिनिधी
पुणे : शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा, तुमच्या योजना चुलीत घाला पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. सरकारनेच काय सगळ्या पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू. आता जे सरकार सत्य झालं त्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी “पैशाचे सोंग आणता येत नाही,” असे सांगत पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर पत्रकारांशी बोलताना तुपकर म्हणाले, “शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय, हे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही कर्जमुक्ती मागतोय कारण आमचा शेती व्यवसाय तोट्यात गेलाय. याला आम्ही जबाबदार नाही, तर सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. सोयाबीन, कापूस यांना योग्य भाव मिळत नाही. तीन वर्षांपासून शेतमाल विक्री न झाल्याने तो घरात पडून आहे. त्यामुळे आमच्यावर कर्ज झाले आहे, आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे.
उद्योगपतींचे उद्योग तोट्यात गेले की, सरकार त्यांचे हजारो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ करते. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला सरकारला अडचण काय? असा सवाल करत तुपकर म्हणाले, शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही. अनेक उद्योगपतींचे उद्योग तोट्यात जातात. तेव्हा राईट ऑफ नावाखाली कर्ज माफ केलें जातं. हजार कोटींचे कर्ज माफ केले जाते. कारण त्यांचा उद्योग तोट्यात जातात. आमचा शेती व्यवसाय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे.
सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेल्या तीन वर्षापासून भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन-कापूस पडून आहे. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्याच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेले आहेत.
सरकारने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचे सांगत तुपकर म्हणाले, “एखादा मोठा प्रकल्प दोन वर्षे उशिरा सुरू केला, तरी काही बिघडत नाही. पण, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे, आत्महत्या थांबवणे आवश्यक आहे. आम्हाला भिकारी बनवण्यापेक्षा शेतमालाला चांगला भाव द्या. मग आम्ही कोणत्याही सरकारच्या दारात भीक मागायला जाणार नाही.
सरकारने एखादा प्रोजेक्ट कमी करावा, शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा, अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा, अत्यावश्यक गोष्ट अशी की शेतकऱ्यांना जगवणे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणे खूप आवश्यक आहे. इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला भिकारी बनवता ते करण्यापेक्षा सोयाबीन, कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या. तुमच्या त्या योजना चुलीत घाला. आम्हाला शेतमालाला चांगला भाव द्या आम्ही आयुष्यात तुमच्या दारात भीक मागायला येणार नाही.
Throw away all your schemes but give loan waiver to farmers, demands Ravikant Tupkar
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची