विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डाेनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या टॅरिफ घाेषणेनंतर भारतीय शेअर बाजार काेसळला आहे. गुंतवणूकदारांचे १९ लाख काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर बाेलताना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी यावर बोलायला हवे, अशी मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, २ तारखेला यावरच मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. देशाच्या संसदेचे अधिवेशन सुरू होते, त्यात केंद्रीय अर्थमंत्री किंवा पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहून टॅरिफमुळे आपल्या देशावर काय परिणाम होणार, हे सांगणे गरजेचे होते. विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, सगळ्यांना एकत्र आणून आपल्या देशासमोर यामुळे कोणते आव्हान उभे राहणार आहे, हे सांगणे गरजेचे होते. परंतु, हे मोठे आव्हान समोर दिसल्यावर भाजपावाले हिंदू-मुस्लिम हा वाद करत त्यातच घुसले. आज बसलेला फटका साधारण २६ लाख कोटींचा आहे.
देशाला बसलेला फटका वाढत जाणार आहे. किती कंपन्या बंद होणार आहेत, किती लोकांचे रोजगार जाणार आहेत, याचा अंदाज तरी केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांना आहे का, या सरकारने त्याचा विचार केला आहे का, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. महागाई वाढणार, बेरोजगारी वाढणार, हा सगळा टॅरिफचा घोळ चाललेला आहे, यावर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही. यात राजकारण आणण्याची गरज नाही, वादविवाद करण्याची गरज नाही. आव्हान आहे हे सगळ्यांना माहिती आहे; परंतु, सगळ्यांना सोबत घेऊन चला, अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड होणार आहे, यावर केंद्र सरकारकडे उत्तर नाही. या सगळ्यावर उत्तर नसल्यामुळे देशात दंगली घडवायच्या एवढेच चालणार आहे. सामान्य नागरिकांना काय फरक पडणार आहे, नोकऱ्या मिळणार आहेत का, जमिनी मिळणार आहे का, जशा अदानींना मिळतात, अशी विचारणा करत राम नवमी झाली आता हनुमान जन्मोत्सव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्येत ज्या जमिनी ट्रस्टच्या असतील किंवा मंदिराच्या आसपास असतील, अदानी किंवा लोढा यांना दिलेल्या आहेत, त्या सगळ्या जमिनी घेऊन कारसेवकांना मोफत घरे बनवून भाजपाने द्यावी, हीच इच्छा आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Union Finance Minister and Prime Minister Modi should talk about stock market, Aditya Thackeray demand
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख