विशेष प्रतिनिधी
मुंबई: आमदार म्हणून निवडून आले तरी सत्ता नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर सैरभैर झाले आहेत. आता ते जणू मुंजरीलाल के हसीन सपने पाहू लागले आहेत. पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील सरकार १००० टक्के पडणार म्हणजे पडणार असा दावा जानकर यांनी केला आहे.
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे प्रतिमतदान घेतलेले आणि ईव्हीएमवर सातत्याने शंका व्यक्त करणारे आमदार उत्तम जानकर यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट आव्हान दिले आहे. तुम्ही जर ईव्हीएम हॅक करुन दाखवलं तर माझी संपूर्ण प्रॉपर्टी भेट देण्यास तयार आहेत असे ते म्हणाले. यावर उत्तर देण्याऐवजी उत्तम जानकर यांनी थेट सरकारच पडणार असल्याचा दावा केला. एव्हढेच नव्हे तर ते म्हणाले, गेल्या एक महिन्यांपासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करत आहे. जे माझ्या तालुक्यात झालं, तेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेलं आहे. मी बारामतीचा अभ्यास केला. त्या ठिकाणी अजित पवार २० हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत. जयकुमार गोरे हे १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत.
निवडणुका होऊन तीन महिने उलटले तरी अद्यापही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. तसेच यापुढे ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेटवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र कोणीही ठोस पुरावे देण्यास तयार नाही.
Uttam Jankar no.. Mungerilal Ke Haseen Sapne, says Mahayuti government will fall in three months
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट