विशेष प्रतिनिधी
Pune News: डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या… त्या धक्क्यातून सावरायचं तर दूरच, अजून अश्रूही सुकले नाहीत… आणि त्याच कपड्यांत, ज्यावर वडिलांच्या रक्ताचे शिंतोडे होते. त्याच कपड्यांतच मुलगी आसावरीने आपल्या वडिलांना अग्नी दिला. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन सुन्न झालं.
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गनबोटे यांची निर्घृण हत्या करण्यात आली . दोघेही लहानपणापासूनचे जिवलग मित्र. सुट्ट्यांसाठी कुटुंबासह गेले होते, पण परत आले ते त्यांचे पार्थिवच.
गुरुवारी पहाटे त्यांची पार्थिवं पुण्यात आणण्यात आली. अंत्यदर्शनासाठी शेकडो नातेवाईक आणि मित्रांनी गर्दी केली होती. आणि त्या वेळी, सर्वांच्या नजरा एका मुलीकडे वळल्या… आसावरी जगदाळे, जिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांची हत्या झाली.
“माझ्या डोळ्यांसमोर बाबा गेले. आम्ही ओरडत होतो, पळत होतो… पण काहीच वाचवू शकलो नाही. ” – आसावरीचा हुंदका सर्वांच्या काळजात घर करून गेला. त्या क्षणाने उपस्थित प्रत्येकाचं हृदय विदीर्ण झालं.
आसावरी, तिचे वडील संतोष जगदाळे, आई प्रगती, आणि काका कौस्तुभ गनबोटे, तसेच काकू संगीता काश्मीरमध्ये सहलीसाठी गेले होते. पण त्या सहलीने आयुष्याचं चित्रच पालटलं. दहशतवाद्यांनी संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या घालून ठार केलं.
संतोष जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर, तर गणबोटे कुटुंबीय रास्ता पेठ, पुण्यात राहतात. आता या दोन्ही घरांमध्ये फक्त शोक, अश्रू आणि एक रिकामेपण आहे जे कधीच भरून निघणार नाही.संतोष जगदाळे यांची हत्या त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोरच झाली. त्यांच्या जाण्याने आसावरीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र कायमचं हरवलं आहे.
Wearing Clothes Stained with Her Father Santosh Jagdale’s Blood, Asavari Lit His Funeral Pyre
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत