विशेष प्रतिनिधी
पुणे : Chief Minister पाेलीसांच्या कार्यपध्दतीवर टीका करत आराेप करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तंबी दिली आहे. वारंवार ते असं बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.Chief Minister
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर बोलताना पातळी सोडून टीका केली आहे.महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेही नाही. शासाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की, त्याचा एक हफ्ता वाढतो. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा हफ्ता वाढतो. दारू बंद केली की ती चालू ठेवण्यासाठी पोलिसांचा हफ्ता वाढतो,”असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.
गायकवाड यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मला वाटतं की पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की, संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी. हे असं चालणार नाही. हे योग्य नाही. वारंवार ते असं बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.
दरम्यान, या राज्यातील पोलिसांनी प्रामाणिकपणे केलं की या जगातील सगळीच गुन्हेगारी शकते. यांनी फक्त सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करावं, असा सल्लाही संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिला हाेता. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
Chief Minister’s anger on MLA Sanjay Gaikwad, warning to take action
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला