Jitendra Awhad : वाल्मिक कराड आज पोलिसांकडे स्वाधीन होणार, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Jitendra Awhad : वाल्मिक कराड आज पोलिसांकडे स्वाधीन होणार, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Jitendra Awad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jitendra Awhad मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड आज पोलिसांकडे स्वाधीन होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मात्र पोलीस त्याला अटक दाखवणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.Jitendra Awhad

आवडेल या संदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये.



वाल्मीक कराड याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती.अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडी आणि पुणे पोलिसांची पथक वाल्मिक कराडच्या मागावर आहेत. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. वाल्मिक कराडवर खंडणीखोरीचे सुद्धा आरोप झाले आहेत.

Valmik Karad will surrender to the police today, claims Jitendra Awad

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023