IT कंपनी प्रकरणातील एचआर कोठडीत!महिला संशयित अद्याप फरार..

विशेष प्रतिनिधी

पुणे:नाशिकमधील एका मल्टीनॅशनल कंपनीत हिंदू कर्मचारी महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.यासंदर्भात ८ हिंदू तरुणी एका तरुणांकडून तक्रार दाखल केल्यानंतर ९ गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणात ६ मुस्लिम तरुणांना पोलिसांकडून या अगोदरच अटक करण्यात आली होती.मात्र आता या प्रकरणात कंपनीची एचआर अश्विनी चैनानी हिला एसआयटी कडून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालय कडून तिला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



ईमेलद्वारे तक्रार

अधिक माहितीनुसार, पीडित महिलांनी एच आर अश्विनी चैनानीला ईमेल द्वारे अनेकवेळा होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली होती,मात्र ‘कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असं होत राहतं..असे सांगत अश्विनी चेनानी कडून प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे तीन जणांना या प्रकरणात पाठीशी घातलं जात असल्याने त्यासंदर्भात तपास करण्यात येतोय.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा संशयित तरुणांना काल न्यायालयाकडून पोलिस कोठडी सुनावण्यात आली.नाशिक सेंट्रल जेल मध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. तर पुण्यातील महिला एचआर अश्विनी चैनानी ला ताब्यात घेण्यात आले आहे.

महिला संशयित फरार

कर्मचारी महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण केल्या प्रकरणी आत्तापर्यंत जवळपास ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.संशयित तरुण आणि कंपनीची एचआर अश्विनी चैनानी ला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.मात्र ह्या सर्व प्रकरणात संशयित महिला असलेलेली निदा खान अद्याप फरार आहे.

HR in IT company case in custody! Female suspect still absconding..

महत्वाच्या बातम्या