प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई: प्रताप सरनाईक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे असे म्हणतात. पण त्यांच्या कथनी अन् करणीत मोठा फरक आहे. ते गावातील भूमिपूत्रांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेघर करत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा लोकांमुळे सरकारचे नाव खराब होत आहे. सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया आहेत, असा आरोप करतभाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Pratap Sarnaik

आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भूखंड लाटल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमती गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दिपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर, मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्र बांधवांच्या 2439 चौ. मीटर पैकी 1219 चौ. मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून, आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे.



नरेंद्र मेहता यांनी या अन्यायाविरोधात ठोस पाऊल उचलण्यासाठी आपल्या समर्थकांना सोमवारी सकाळी 11 वा. मिरा भाईंदर येथील भाजप जिल्हा कार्यालयात जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आज दुपारी त्यांनी आपल्या समर्थकांसह कासारवडवली पोलिस ठाण्यात जाऊन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या या भूमिकेमुळे मिरा – भाईंदर परिसरात पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

प्रताप सरनाईक हे सर्वात मोठे भूमाफिया असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, प्रताप सरनाईक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे असे म्हणतात. पण त्यांच्या कथनी अन् करणीत मोठा फरक आहे. ते गावातील भूमिपूत्रांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेघर करत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा लोकांमुळे सरकारचे नाव खराब होत आहे. सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया आहेत. ते आतापर्यंत हेच काम करत आलेत. त्यांच्याविरोधात ठाण्यात अनेक तक्रारी आहेत. मिरा भाईंदरमध्येही ते तेच करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मेहता यांनी केली.

Pratap Sarnaik termed biggest land mafia; BJP MLA Narendra Mehta files police complaint

महत्वाच्या बातम्या