सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होणार,  एक्झिट पोलचा अंदाज

विशेष प्रतिनिधी

 मुंबई : बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे. Sunetra Pawar

सुनेत्रा पवार यांना अभूतपूर्व असे तब्बल ९२ ते ९७ टक्के मतदान मिळू शकते आणि त्या विक्रम नोंदवतील असा अंदाज आहे. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कार्डिले हेही चांगल्या मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. रिंगसाईड रिसर्च या कंपनीनेने केलेल्या एक्झिट पोल नुसार
अक्षय कार्डीले यांना ७८ ते ८३ टक्के मतदान मिळू शकते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना ७ ते ९ टक्के इतके मतदान मिळू शकते असे रिंगसाईड रिसर्च चा एक्झिट पोल सांगतो आहे.

बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्या असा प्रयत्न सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात आला होता. पण या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. पण या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनाच कौल मिळताना दिसत आहे.

Sunetra Pawar Set for Record-Breaking Victory, Exit Polls Predict

महत्वाच्या बातम्या