सरकारी कपड्यांचा आणि वाहनांचा वापर टाळला; पोलिसांनी निदा खानला ताब्यात कसं घेतलं?

विशेष प्रतिनिधी

संभाजीनगर: TCS कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मागील अनेक दिवसांपासून फरार असलेली निदा खान पोलिसांना वारंवार गुंगारा देत होती.अखेर संभाजी नगर मधील नरेगाव भागातून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

TCS कंपनीतील जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खान मागील अनेक दिवसांपासून फरार होती.अनेक दिवसांपासून पोलिस निदा खानच्या शोधत होते,मात्र ती प्रत्येकवेळी पोलिसांना वारंवार गुंगारा देत होती.निदा खान प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिस पथकाला एक महत्वाची सूचना मिळाली,निदा खान संभाजी नगरमधल्या नरेगाव येथील कैसर कॉलनी भागात आई आणि मावशी सोबत भाड्याचा घरात राहत होती.



 माहिती कशी मिळाली?

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या ३ ते ४ दिवसांपासून कैसर कॉलनी मधील फ्लॅट मध्ये राहायला आली होती.ह्याच घरात तिच्यासोबत निदा खानचे आई,वडील, भाऊ आणि तिची मावशी देखील वास्तव्यास होते.मात्र तांत्रिक गोष्टींच्या आधारावर निदा खान त्याच ठिकाणी राहत असल्याचे निष्पन्न झाले.

 योजना कशी यशस्वी झाली?

पोलिसांकडून प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेऊन, गुप्तरीत्या ही योजना राबवण्यात आली.निदा खान राहत असलेल्या फ्लॅट जवळ २० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.महत्वाचे म्हणजे तैनात असलेले पोलिस हे सध्या कपड्यांमध्ये त्या ठिकाणी गेले होते.पोलिसांकडून पोलिस प्रशासनाच्या गाड्या आणि मोठ्या जीपचा वापर केला नाही.

जवळपास ४ दिवसांपासून पोलिसांकडून सध्या वेशात कैसर नगर भागात गस्त घातली जात होती.निदा खान संभाजीनगर मधील काही वकिलांचे देखील संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.निदा खान अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.

Avoided using government clothes and vehicles; How did the police arrest Nida Khan?

 

महत्वाच्या बातम्या