विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis राज्य सरकारने मराठा समाजासाठीच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. उलट त्या अधिक ताकदीने राबवण्यात येत असून, मराठा समाजासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक काम आपल्या सरकारने केले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला.Devendra Fadnavis
पुणे अॅग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध आर्थिक आणि शैक्षणिक योजना सुरू केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योजक घडवले जात आहेत, तर ‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुणांना प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निर्वाह भत्ता आणि इतर योजनांद्वारे मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नियमांमध्ये बसणाऱ्या सर्वांनाच प्रमाणपत्रे दिली जात आहेत. प्रमाणपत्रांच्या वैधतेची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुरू असून, त्यासाठी न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. सातारा गॅझेटसंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे कायदा आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार सरकार काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारची तयारी अंतिम टप्प्यात असून मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली आहे. काही अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून ती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल. ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात घटली आहे. बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये निर्यात कमी झाल्याने बाजारभावावर परिणाम झाला आहे. उत्पादन जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने दर घसरले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने १२ रुपये ५० पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis claims his government has done the most for the Maratha community
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा