Eknath Shinde ऑपरेशन टायगर : ठाकरे गटाचे खासदार – आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्याला दुजाेरा दिला आहे. “आमच्या संपर्कात सध्या अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा ते एकनाथ शिंदे ठरवतील,” असे शिरसाट म्हणाले. Eknath Shinde

संजय शिरसाट म्हणाले, “सध्या तरी आमची कोणतीही ऑपरेशन टायगर करण्याची मानसिकता नाही. आम्ही स्वतःहून तसे काही करत नाही आहोत. मात्र, ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. अनेक जण आमच्या संपर्कात असून, आगामी काही महिन्यांत हे सर्व विरोधक एकत्र राहतील असे मला वाटत नाही.” Eknath Shinde



राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, रोहित पवार केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी. Eknath Shinde

मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर शिरसाट म्हणाले, “आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही, त्यांना ती शिकण्यासाठी काही वेळ दिला होता. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये त्या त्या राज्याची स्थानिक भाषा बोलली जाते, मग मुंबईत मराठी का बोलली जाऊ नये? एवढी सवलत देऊनही जर कोणी ऐकत नसेल, तर ती त्यांची मुजोरी म्हणावी लागेल आणि अशा लोकांवर कडक कारवाई होईलच.”

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचे त्यांनी कौतुक केले, मात्र सोबतच यंत्रणेच्या आधीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिरसाट म्हणाले, “एफडीएच्या या मोठ्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. धाडसी अधिकाऱ्यांना सरकार पूर्ण संरक्षण देईल. मात्र, प्रश्न असा पडतो की आतापर्यंत हे अधिकारी झोपले होते का? आपल्याकडे आधुनिक लॅब का नव्हत्या आणि तपासण्या का रखडल्या होत्या? यावरून काही अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांसोबत आर्थिक लागेबांधे होते हे उघड होते. आता ही कारवाई कोणत्याही दबावाखाली थांबता कामा नये.

Operation Tiger: Thackeray Camp MPs, MLAs in Tou ch with Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या