जिवाला धोका, संरक्षणाची मागणी, प्रसाद वेदपाठक यांनी मांडली मनसेकडे कैफियत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टी वादाच्या मुद्द्यावर समाजमाध्यमांवर आवाज उठवणारा युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे असून, काही अज्ञात व्यक्ती आपला सतत पाठलाग करत असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची त्यांनी भेट घेतली.

वाढत्या धमक्यांमुळे घाबरलेल्या प्रसाद यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. अविनाश जाधव यांनी प्रसाद वेदपाठकच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याचा शब्द दिला आहे. आमची बांधिलकी थेट जनतेशी आहे. प्रसादने जो आवाज उठवला आहे, तो एका विशिष्ट चुकीच्या वृत्तीविरोधात आहे. योग्य आणि न्याय्य गोष्टीच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच उभी राहिली आहे आणि पुढेही राहणार. आम्ही मतांच्या राजकारणासाठी नाही, तर मराठी अस्मितेसाठी लढतो, अशा शब्दांत जाधव यांनी प्रसादला धीर दिला.



प्रसाद वेदपाठक म्हणाले. काही जैन धर्मीय सोशल मीडियावर आक्रमक झाले असून त्याच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्या जात आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘मास रिपोर्टींग’ करण्यात आल्यामुळे त्याचे अकाउंट सस्पेंड झाले आहे. अकाउंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत प्रसादने, जे योग्य आहे ते बोलल्यानंतर हेच फळ मिळते. काही लोक पाळत ठेवून असल्याने जीवाला धोका निर्माण झाल्याचे सांगत त्याने मदतीचे आवाहन केले आहे.

घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन कुटुंबीयांनी इतर सदस्यांना न विचारता जैन साध्वींच्या चालण्यासाठी रस्त्यावर पांढरी पट्टी मारली होती. सोसायटीतील इतर सदस्यांनी याला तीव्र विरोध केला होता. प्रसाद वेदपाठकने या घटनेवर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर आवाज उठवला.

हा वाद वाढल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यात उडी घेत आक्रमक पवित्रा घेतला. या पांढऱ्या पट्ट्या तात्काळ हटवण्यात याव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने त्यावर काळा रंग मारण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. अखेर वाढत्या विरोधामुळे या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून ती हटवण्यात आली असून, स्वतः प्रसादने याची माहिती दिली आहे.

Facing threat to life, Prasad Vedpathak seeks protection; submits plea to MNS

महत्वाच्या बातम्या