Shivdurga-Shiv Samvad : शिवसेनेची महिला सेना मैदानात उतरणार, राज्यभरात शिवदुर्गा-शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन

विशेष प्रतिनिधी 
मुंबई  : Shivdurga-Shiv Samvad मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा सुरु असताना आता महिला सेनेच्या प्रमुख नेत्या संघटनात्मक आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. १५ जून ते १६ जून २०२६ पासून सुरु होणाऱ्या शिवदुर्गा-शिवसंवाद दौऱ्याची माहिती या दौऱ्याच्या समन्वयक शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांनी आज दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना सचिव व आमदार डॉ. मनिषा कायंदे, प्रवक्त्या व खासदार डॉ. ज्योती वाघमारे, राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या शायना एन.सी आणि उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे या उपस्थित होत्या. Shivdurga-Shiv Samvad
विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींचा शिवसेना आणि महायुतीला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला होता. निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या महिला सेनेने राज्याचा दौरा केला होता. त्याचप्रमाणे आताही महिला सेनेच्या नेत्या राज्यात विधानसभानिहाय दौरा करणार आहेत, असे मीनाताई कांबळी म्हणाल्या. मागील चार वर्षात शिवसेनेत प्रचंड संख्येने पक्ष प्रवेश झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला सेनेमध्येही विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यांमधील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा महिला सेनेच्या संघटनात्मक नियुक्त्यांबाबत आढावा घेऊन निर्णय घेतले जातील, असे मीनाताई कांबळी यांनी यावेळी सांगितले.Shivdurga-Shiv Samvad


आमदार डॉ. मनिषा कायंदे म्हणल्या की, या दौऱ्यासाठी महिला सेनेच्या तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या तीन टीमकडून पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील ८३ विधानसभा मतदार संघांसंदर्भात महिला सेनेच्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. प्रत्येक टीमध्ये प्रत्येकी ६ वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.  राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन महिला सेना कशा प्रकारे वाढवता येईल, यासाठी हा शिवदुर्गा-शिवसंवाद आयोजित केल्याचे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना रणरागिणींना आवाहन करत आहे की त्यांची पक्षासाठी काम करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेने महिला नेतृत्वाला नेहमीच प्रोत्साहन दिले, असे राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या शायना एन.सी यांनी सांगितले

महिलांमधील नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी शिवदुर्गा-शिवसंवाद दौरा महत्वाचा ठरेल, असे खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले. या दौऱ्याचा अहवाल पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सादर केला जाईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना, लाडकी लेक योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, सरकारी नोंदीवर आईचे नाव लावणे, एसटीमध्ये महिलांना तिकिटांवर ५० टक्के सवलत असे अनेक मोठे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले. प्रत्येक निर्णयात लाडक्या बहिणी कशा सक्षम होऊ शकतात, याला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले, असे खासदार वाघमारे यांनी सांगितले.

शिवदुर्गा-शिवसंवाद दौरा
टीम १ – अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी
एकूण २५ विधानसभा मतदार संघासंदर्भात बैठका घेणार.
टीममधील सदस्य
आमदार डॉ. मनिषा कायंदे, उपनेत्या आशाताई मामेडी, डॉ. शिल्पा देशमुख, ज्योति मेहेर, सुवर्णा करंजे, सुलभा उबाळे.
———–
टीम २ – नांदेड, हिंगोली, जालना, बीड  
एकूण २३ विधानसभा मतदार संघासंदर्भात बैठका घेणार.
टीममधील सदस्य
खासदार डॉ. ज्योती वाघमारे, उपनेत्या कला शिंदे, विजया पोटे, प्रिती बंड, संगीता ठोंबरे, शायना एन.सी
टीम – ३ नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार
एकूण ३५ विधानसभा मतदार संघासंदर्भात बैठका घेणार.
टीममधील सदस्य
उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावीत, प्रवक्त्या सुशीबेन शहा, राजश्री पाटील
https://youtu.be/bJnf5MjdjYQ?si=HS0EwdzbS_TklK93

Shiv Sena Women’s Wing Hits the Ground with Statewide ‘Shivdurga-Shiv Samvad’ Outreach Drive

महत्वाच्या बातम्या