विशेष प्रतिनिधी
मुंबई : BEST Employees औद्योगिक न्यायालयाने संपावर अंतरिम स्थगिती आदेश दिला असतानाही बेस्ट कामगार कृती समितीने शुक्रवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आज गुरुवारी दादर येथे 12 कामगार संघटनांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.BEST Employees
कामगार संघटनांनी निवृत्त कर्मचाऱ्यांची 1,410 कोटींची थकबाकी तातडीने अदा करावी, सर्व कर्मचाऱ्यांना अंतरिम 1,500 वेतनवाढ द्यावी, 8वा वेतन आयोग लागू करावा, वेट लीज पद्धत रद्द करावी, सर्व बस बेस्टच्या नियंत्रणाखाली आणाव्यात, वेट लीज कर्मचाऱ्यांचे बेस्टमध्ये समायोजन करावे, 3,000 वाहकांची भरती करावी आणि बेस्ट व बृहन्मुंबई महापालिकेचे अर्थसंकल्प एकत्रित करावेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.BEST Employees
दरम्यान, संप रोखण्यासाठी बेस्ट प्रशासनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संपाला अंतरिम स्थगिती दिली असली तरी कामगार संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा, 2023 लागू केला आहे. या कायद्यानुसार मुंबईतील सार्वजनिक बस सेवा आणि वीजपुरवठा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आल्या असून, सेवा अखंडित ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
संप प्रत्यक्षात सुरू झाल्यास मुंबईतील लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. तसेच कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BEST Employees’ Strike Continues Despite Court
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला