Vinay Sahasrabuddhe : एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्त्रबुद्धे यांचे पॅनेल विजयी; कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vinay Sahasrabuddhe द एशियाटिक सोसायटी मुंबईच्या बहुचर्चित आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी माजी खासदार कुमार केतकर यांचा तब्बल १९२ मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालासह केतकर यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला.Vinay Sahasrabuddhe

अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना ३४९ मते, तर कुमार केतकर यांना १५७ मते मिळाली. मानद सचिवपदी विवेक वसंत गणपुळे यांनी ३५२ मते मिळवत विजय मिळवला.Vinay Sahasrabuddhe



उपाध्यक्षपदाच्या चार जागांवर रमेश पतंगे (३२९), नितीश भारद्वाज (३२८), चंद्रप्रकाश द्विवेदी (३२७) आणि संजय देशमुख (३२३) विजयी झाले.

व्यवस्थापन समितीच्या सहा जागांवर प्राची मोघे (३४२), माधव भंडारी (३३९), मल्हार कुलकर्णी (३३३), प्रमोद बापट (३२९), व्ही. एम. चक्रवर्ती (३२४) आणि राजेश बेहरे (३२१) यांनी बाजी मारली.

स्क्रुटिनायझिंग समितीच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहा नगरकर (३७०), अभिजित मुळ्ये (३६२), माधवी नरसाळे (३६२), उमंग काळे (३५८), अमोल जाधव (३४९), मल्हार गोखले (३४८) आणि दत्तात्रय पंचवाघ (३४४) विजयी झाले.

यंदाची निवडणूक दोन्ही पॅनेलसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. विशेषतः नव्याने नोंदणी झालेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. हा वाद धर्मादाय आयुक्तांपासून मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर शनिवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले.

एकूण २,५३० पात्र मतदारांपैकी ५१७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली, तरी पावसामुळे मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली. मात्र, निकालात डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पॅनेलने सर्व प्रमुख पदांवर वर्चस्व मिळवत एशियाटिक सोसायटीच्या कारभाराची धुरा आपल्या हाती घेतली.

Vinay Sahasrabuddhe Panel Sweeps Asiatic Society Mumbai Polls, Kumar Ketkar Suffers Major Defeat

महत्वाच्या बातम्या