Arju Bishnoi gang : रावेत गोळीबार प्रकरणी आरजू बिष्णोई गॅंगच्या तिघांना उत्तराखंड येथून अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : Arju Bishnoi gang रावेत येथील एका फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याप्रकरणी आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गॅंगच्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंड येथून अटक केली. या आरोपींनी रावेत येथील ए जे फर्निचर मॉलवर आठ गोळ्या झाडल्या होत्या. दोन कोटींच्या खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले असून या घटनेचा संबंध लॉरेन्स बिष्णोई गॅंगशी जोडला जात आहे.Arju Bishnoi gang

प्रवीण राम निवास (२३, बेरी, झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप राठी (२१, काकराना, रोहतक, हरियाणा), सागर अजय पाल (२१, सोनपत, हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.Arju Bishnoi gang



१५ मे रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास रावेत येथे ए जे फर्निचर मॉल या दुकानासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. आरोपींनी आठ गोळ्या झाडल्या. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. या घटनेनंतर या घटनेची जबाबदारी बिष्णोई गॅंगने घेतल्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा गोळीबार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपींचा इंदोर, चंदीगड, रोहतक, हरिद्वार असा पाठलाग केला. उत्तराखंड येथे एका लॉजमध्ये आरोपी लपून बसले असल्याची माहिती मिळाली असता गुंडा विरोधी पथकाने तिघांना सापळा लावून अटक केली. बुधवारी (२० मे) रात्री उशिरा त्यांना पुणे येथे विमानाने आणण्यात आले.

Ravet firing case: Three members of Arju Bishnoi gang arrested from Uttarakhand

महत्वाच्या बातम्या