Laxman Hake : ओबीसींचे आरक्षण ठरवून संपवण्याचे कटकारस्थान , लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

विशेष प्रतिनिधी

सातारा : Laxman Hake राज्यातील सत्ताधारी राजकारणी हे लुटुपुटीची लढाई लढत आहेत आणि ओबीसींचे आरक्षण हे ठरवून संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.Laxman Hake

ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान सातारा अंतर्गत सातारा जिल्हा ओबीसी संघटना व ओबीसी बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आज प्रबोधन शिबिर आयोजित केले होते.Laxman Hake

वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण हाके तसेच एडवोकेट मंगेश ससाणे व इतर नेते उपस्थित होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व ॲडव्होकेट मंगेश ससाणे तसेच जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांची बोलताना लक्ष्मण हाके यांनी वरील आरोप केला.Laxman Hake



खुल्या जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराला ओबीसींचे पद द्यायचं हे कोणत्या नैतिकतेत बसतं असा सवाल लक्ष्मण हाके यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे नाव घेऊन केला. कारण सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महेश शिंदे यांची पत्नी पूजा शिंदे या यांची निवड झाली आहे. त्यावेळी झालेल्या राड्याच्या अनुषंगाने बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, अध्यक्षपद हे ओबीसींसाठी राखीव असताना त्यांना मिळण्याऐवजी तसेच ओबीसींचे उमेदवार निवडून आलेले असताना ओबीसींच्या जागेवर खुल्या जागेतून निवडून आलेले सदस्यांना ती जागा देणे हे चुकीचे आहे. ओबीसींचे आरक्षण आता संपलंय ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत. राजकारणी हे ठरवून करत असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात मराठा कुणबी दाखल्याच्या द्वारे ओबीसी ची जागा घेतल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तसाच त्यांनी रस्त्यावर येऊन हा प्रश्न उपस्थित करावा असेही त्यांनी आवाहन केले आहे. आगामी निवडणुकीत आमच्या वाड्यावर मत मागायला या मग आम्ही तुम्हाला दाखवू असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी साताऱ्यातील पुढाऱ्यांना दिला.

Conspiracy to End OBC Reservation, Alleges Laxman Hake; Targets Ruling Government

महत्वाच्या बातम्या