विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shivraj Motegaonkar आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्येच लीक झालेली नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे.Shivraj Motegaonkar
सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने मोटेगावकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्ये नीटची लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडली. तपास यंत्रणांच्या मते, मोटेगावकर हे थेट नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी होते आणि परीक्षा होण्याच्या जवळपास दहा दिवस आधीच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती.Shivraj Motegaonkar
सीबीआयच्या आरोपानुसार, मोटेगावकर यांनी साथीदारांच्या मदतीने प्रश्नपत्रिका मिळवून अनेक विद्यार्थ्यांना हस्तलिखित नोट्सद्वारे प्रश्न आणि उत्तरे पुरवली होती. परीक्षा संपल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी या नोट्स नष्ट करण्यात आल्याचा संशयही तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.Shivraj Motegaonkar
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर यांचे राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) मधील काही प्राध्यापकांशी संबंध होते. तपासाच्या भोवऱ्यात असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिल्ली येथील सीबीआयच्या विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरांवर झाडाझडती केली. या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील विदर्भ कनेक्शन अधिक ठळक झाले आहे. नागपूर येथील सीबीआय पथकाने या कारवाईत सहकार्य केले.
या प्रकरणातील नव्या उघडकींमुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सीबीआयकडून पेपरफुटी रॅकेटच्या आणखी धागेदोऱ्यांचा तपास सुरू आहे.
Leaked NEET question paper found in RCC Classes director Shivraj Motegaonkar’s mobile
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा