विशेष प्रतिनिधी
मुंबई : BMC मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.BMC
या संदर्भातील माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. आता या समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांच्या विरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, उर्वरित अनेक प्रकरणांमध्ये अद्याप प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.BMC
न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या आणि मुंबईतील ‘एच/पूर्व’, ‘के/पूर्व’, ‘एस’, ‘एम/पूर्व’, ‘एफ/उत्तर’, ‘आर/उत्तर’, ‘पी/दक्षिण’ व ‘जी/उत्तर’ या महत्त्वाच्या प्रभागांतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मतमोजणीतील आक्षेप, उमेदवारी अर्जाबाबतचे वाद आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या विविध मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीला आव्हान दिले गेल्यामुळे, आगामी काळातील न्यायालयीन निर्णयांचा महापालिकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आता पुढील सुनावण्यांकडे लागले आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता अनुभवलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीने ठाकरेंची सत्ता उलथवून लावली असून, यात 89 जागा मिळवत भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 3, समाजवादी पार्टीला 2 आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला 1 जागा मिळाली असून, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची अधिकृत यादी आहे.
Petition filed in court challenging selection of 79 corporators in BMC
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा