विशेष प्रतिनिधी
ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्था ठाणे – पालघर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. बहुजन विकास आघाडी चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना थेट उमेदवार देणे किंवा त्यांचे पुत्र माजी आमदार क्षितीज ठाकूर यांना शिवसेनेचा पाठिंबा रिंगणात उतरवण्याचा पर्याय चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे – पालघर मतदारसंघातील संख्याबळ पाहता भाजपाकडे सर्वाधिक म्हणजेच ४४४ मतांचे संख्याबळ आहे.त्यामुळे ही जागा आपल्याकडे कायम ठेवायची असेल तर शिंदेंना अतिरिक्त मतांची गरज लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार पट्ट्यात प्रभाव असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या ७१ मतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हितेंद्र ठाकूर आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संबंध या अगोदर देखील चर्चेत आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूने एकमेकांना अप्रत्यक्ष सहकार्य केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सध्या महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि भाजप शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा लक्षात घेता, शिंदेंची सेना बहुजन विकास आघाडी सोबत राजकीय फॉर्मुला तयार करू शकते,असे अंदाज बांधले जात आहेत.
वसई – विरार जागेवर भाजपाचा दावा..
भाजपाने देखील या जागेवर आपला दावा बोलून दाखवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर भाजपा ही जागा आपल्या वाटेला या विषयासाठी आग्रही भूमिका घेत आहे. च्या परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेना समोर स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हितेंद्र ठाकूर नेमके कोण?
हितेंद्र ठाकूर हे वसई-विरार आणि पालघर परिसरातील प्रभावशाली नेते तसेच बहुजन विकास आघाडीचेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये शिक्षण घेतल्यानंतर वर्तक महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. विद्यार्थी दशेतच त्यांनी कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलमध्ये जनरल सेक्रेटरीपद जिंकत नेतृत्वाची छाप पाडली. 1988 पासून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि युवक काँग्रेसचे तालुका प्रमुख म्हणून काम करताना त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली. काँग्रेसच्या तिकिटावर अवघ्या 29व्या वर्षी ते आमदार झाले आणि वसईतील जनता दलाचा बालेकिल्ला मोडून काढत स्वतःचे मजबूत राजकीय वर्चस्व निर्माण केले. पुढे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आणि वसई-विरार परिसरात पक्षाचे प्रभावी जाळे उभे केले. विकासकामांच्या जोरावर त्यांनी महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्येही आपली पकड मजबूत केली.
Thane – Shinde’s move in Palghar; Will Hitendra Thakur or Kshitij Thakur be fielded?
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात ४०० कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- इद्रिस नायकवडींच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण; आमदार म्हणाले- “ही केवळ वावडी”
- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक
- गोकुळ दूधसंघासाठी तीन महिन्यांत निवडणूक? सहकार विभागाचे महत्वाचे आदेश जारी