Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
विशेष प्रतिनिधी मुंबई:Nagpur नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प (HEMCP) स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार आहे.













