विशेष प्रतिनिधी
पुणे : हडपसर व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे १४ ते १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध दारू व्यवसायाविरोधात थेट कारवाई केली.
आज शिवसैनिकांसह त्यांनी कृष्णा नगर, तरवडे वस्ती, पोलीस चौकी पाठीमागील परिसर तसेच साठे वस्ती येथे सुरू असलेल्या सुमारे ८ ते १० अवैध दारूभट्ट्यांवर धाड टाकून त्या उध्वस्त केल्या.
या भागात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीकडे संबंधित प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
“
दारूमाफियांच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला,” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना भानगिरे यांनी व्यक्त केली.
विषारी दारू विक्री करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पुणे शहरातील अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि दारूमाफियांच्या विरोधात शिवसेनेचा लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले.
Hadapsar illegal liquor dens demolished, Shiv Sena leader Nana Bhangire turns aggressive
महत्वाच्या बातम्या