विशेष प्रतिनिधी
पुणे: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खानवडी येथे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँडिंग होताना मोठा अनर्थ ट ळल्याची घटना घडली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ फुले जयंतीनिमित्त खानवडी येथे कार्यक्रमासाठी आले होते.मात्र, नियोजित हेलिपॅड वर हेलिकॉप्टर उतरण्याऐवजी थेट कार पार्किंग मध्ये उतरलवल्याने मोठी धावपळ पाहायला मिळाली.
सदरील कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलीपॅड ची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही छगन भुजबळ प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टर च्या पायलटला कार पार्किंग मध्ये असलेली मोकळी जागा हेलिपॅड असल्याचे भासल्याने माझ्याकडून त्या ठिकाणी लँडिंग करण्यात आले.
जीवितहानी नाही
सुदैवाने या सर्व घटनेत कोणतीही हानी झाली नाही.पार्किंग मध्ये अनेक कार उभ्या होत्या मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाले नसल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांकडून तातडीने हेलिकॉप्टर पायलटला योग्य माहिती देण्यात आल्यानंतर हेलिकॉप्टर हटवण्यात आले.लोकवस्तीच्या जवळ ही मोठी चूक झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
घटनेची चौकशी होणार
दरम्यान ह्या सर्व घटनेची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.पायलट कडून नेमकी चूक कशी झाली?काही तांत्रिक अडचण होती का?असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Bhujbal’s helicopter lands directly in the car parking lot! A major disaster was averted..
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर