Dhananjay Munde : मराठा समाजाला धनंजय मुंडे यांचा सल्ला, आर्थिक मागासपेक्षा ओबीसीचा कट ऑफ जास्त

विशेष प्रतिनिधी

बीड : Dhananjay Munde ज्यांना नव्याने ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत, त्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे, मात्र सवर्ण जातीसाठीच्या आर्थिक मागास प्रवर्गातून जर या नव्याने दाखले मिळवलेल्यांनी अर्ज केला असता तर कमी गुण मिळाले असते तरी ते पास झाले असते. त्यामुळे हे कोणाला फसवत आहेत? असा सवाल करत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणच कसे फायदेशीर आहे असा सल्ला दिला आहे.Dhananjay Munde

गोपीनाथ गड येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पंकजा मुंडे यांचा ऊसाची मोळी आणि कोयता देऊन सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रितम मुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यावेळी उपस्थित होते.Dhananjay Munde

धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही कोणाला विरोध केला नाही, ना आम्ही कोणाच्या विरोधात आलो. हा अध्यात्म आणि शिक्षणाशी जोडला गेलेला समाज आहे. बीडमध्ये सुरु असलेले जातीपातीचे आणि एकमेकांकडे दुषित नजरेने पाहाणे बंद झाले पाहिजे, याची सुरुवात आजपासून आपल्याला करायची आहे.

राज्यात सध्या आरक्षणावरुन सुरु असलेल्या राजकारणावर धनंजय मुंडे म्हणाले, काही ठराविक लोकांकडून फक्त स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी दोन जातींना लढवले जात आहे. मुंडेंनी कोणाचेही नाव न घेता, मराठवाड्यात उभ्या केल्या जात असल्याचे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षावर भाष्य केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याचा आम्हाला आनंद आहे. कारण त्या आरक्षणासाठी आम्ही देखील लढलेलो आहे. मात्र काही लोकांना ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. मराठा समाजासाठी सरकारला जे काही करायचे आहे, ते सर्व त्यांनी केले आहे. आरक्षण दिले आहे, आणखी दिले तरी आमचे काही म्हणणे नाही. मात्र, एकाच्या ताटातील काढून दुसऱ्याच्या ताटात देण्याचे काम सरकारनेही करु नये, असे आमदार मुंडे म्हणाले.

मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत. यामुळे मराठा समाजाला आता ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, नव्याने दाखले मिळालेल्यांनी समजून घेतले पाहिजे की, नुकत्यात झालेल्या एमपीएससी परीक्षेत ओबीसीचा कटऑफ हा आर्थिक मागास समाजाच्या आरक्षणापेक्षा जास्त आहे. ओबीसीचा कटऑफ ४८५ होता तर आर्थिक मागास प्रवर्गाचा कटऑफ ४५० होता.

Dhananjay Munde’s advice to the Maratha community, the cut-off for OBC is higher than for economically backward.

महत्वाच्या बातम्या