Manoj Jarage Patil : दारिद्र्याचा गंज काढायचा असेल शासक बना, मनोज जरागे पाटील यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

बीड :Manoj Jarage Patil दारिद्र्याचा गंज काढायचा असेल शासक बनावे लागेल. जातीच्या अडचणी दूर करण्यासाठी शासक बनावे लागेल. मराठ्यांनी हुशार व्हावे. टंगळ-मंगळ बंद करावी. यापुढे मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनायचे. मराठ्यांनी डोके लावून हुशारीने शासक बना आणि प्रशासक बनवा. शासक बनल्यास कुणाला मागायची गरज पडणार नाही, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी केलेManoj Jarage Patil

बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे मेळाव्यासाठी हजर झाले होते. यावेळी जरांगे-पाटलांना बोलताना त्रास होत होता. जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.Manoj Jarage Patil



ते म्हणाले, शेतीचे काम करताना आणि नोकरी करताना शासक बनण्याचे डोक्यात ठेवा. प्रशासनात एवढी ताकद आहे की दादा जरी असला तरी त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभे राहावे लागते. प्रशासनात सगळे बोगस आरक्षण घेतलेले लोक बसले आहेत. लोक जातीचे काम करायचे असेल तर सत्ता असो किंवा नसो प्रशासनाला आपले अधिकारी असेल तर बरोबर खुटा ठोकतो.

जरांगे-पाटील म्हणाले, मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा असो किंवा खूप दिवसांचा मला आता त्याची चिंता नाही. जीवनात येऊन सिद्ध करायचे होते, ते मी केले आहे, मला बोलण्यास त्रास होत आहे. मला जशी मला ताकद मिळाली, तशी शेतकऱ्यांना मिळावी. पाच ते सहा महिन्यांपूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की, ‘मी थोड्या दिवसांची पाहुणा आहे.’ आपण मुंबईला हाक दिली. कारण, मी बोललो की, शेवटी शरीर आहे. मला गरिबांच्या लेकरांचं आयुष्य करू द्या. मुंबईला चला. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजातील लेकरांना आरक्षण दिलेले मला पाहायचं आहे. कुणी मागे हटू नकू… सरकू नका.. तुम्ही आता साथ दिली, तर लेकरांचं कल्याण करू शकलो. तुम्ही साथ आणि जीआर जिंकून आलो.”

“खूप जणांनी सातारा संस्थान ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि हैदराबाद गॅझेट ( मराठवाडा ) येथील मराठा आरक्षणात गेला तर राज्याला नाहीतर देशाला वेढा टाकेल म्हणून आरक्षण मिळून देत नव्हते. दुसरे विरोधात गेले पण आपल्यांनी फितूर व्हायला नको होते. जीव धरणीला टेकला तरी मागे हटलो नाही, हे फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे होते. लढणारा मी, समाज आहे. तुम्हाला विकून, तुमच्याशी गद्दारी करून मी मोठा झालो असतो, तर फितुरी करायला पाहिजे होती. तुमचे रक्त आमचे असून सुद्धा इतके भेसळ रक्तासारखे कसे वागलात? हे मराठ्यांना कळले नाही. आमच्यासोबत नाही तर मिळाले त्यात सुद्धा समाधान व्यक्त करत नाहीत. तुम्हाला आयुष्यात काही देता आले नाही. ४५ वर्षांच्या लढाईत काहीच करता आले नाही. पांढरे कपडे घालून मोठ्या गाड्यांमध्ये फिरले. फक्त टीव्हीसमोर बोलले आणि पुस्तके वाचली. यातच यांनी मोठेपण आणि मर्दांगी गाजवली,” असे म्हणत मराठा समाजातील नेत्यांना सुनावले

If you want to remove the rust of poverty, become a ruler, appeals Manoj Jarage Patil

महत्वाच्या बातम्या