स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरा, ठाकरे गटाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 ची केंद्रीय निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकांसाठीची मतदार यादी आधारभूत धरून त्याप्रमाणे निवडणुका आयोजित करण्याचे घोषित केले आहे.

एक जुलै 2025 या आधारभूत तारखेनंतर वाढलेल्या मतदारांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करणेबाबत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करणेबाबतही चर्चा या बैठकीत करण्यात आली.



राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या सर्व आक्षेपांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन या शिष्टमंडळास दिले.सदर बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त श्री सुरेश काकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपसचिव प्रवीण महाले, उपसचिव श्री सचिन परसनाईक व श्री दिनेश बोभाटे उपस्थित होते. मतदार यादी परिपूर्ण केल्यानंतरच ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मा. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे करण्यात आली.

Use complete voter list for local body elections, Thackeray group demands from State Election Commission

महत्वाच्या बातम्या