विशेष प्रतिनिधी
करमाळा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर शनिवारी सकाळी हल्ला करण्यात आला.
महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्यावर झालेला हल्ला हा दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे.
महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. आपल्यावर झालेला हल्ला हा दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर त्यांची बहिणी रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. चिवटे यांच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला आहे.
दिग्विजय बागल यांनी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांची उमेदवारी घेऊन लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे देखील आले होते,
Eknath Shinde’s OSD Mangesh Chivte’s brother fatally attacked in Karmala
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ